आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआयएसएफकडे शिर्डीची सुरक्षा, व्हीआयपी पास होणार बंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिर्डी येथील श्री साई देवस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलावर (सीआयएसएफ) सोपवण्यात येणार आहे. यामुळे आता शिर्डीतील सुरक्षा नियम कडक होणार असून व्हीआयपी पासची सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.

शिर्डीत गुरुपौर्णिमा, रामनवमीसारख्या सणांच्या वेळी येथे जनसागरच उसळतो. भाविकांची वाढती गर्दी आणि दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन केंद्राने शिर्डीला तिरुपतीप्रमाणे ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा असावी, असा प्रस्ताव राज्याकडे पाठवला होता. त्याला राज्याच्या गृह मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना दिली.

तिरुपतीप्रमाणे सनदी अधिकारी
तिरुपतीचा कारभार भारतीय महसूल खाते पाहते. शिर्डी देवस्थानची वार्षिक उलाढाल 500 कोटींवर असल्याने या धर्तीवर आयएएस अधिका-याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्याचे विखे म्हणाले.

पुढे काय?
- या सुरक्षेमुळे साईनगरीत भाविक अधिक सुरक्षित राहू शकतील.
- सुरक्षेवरील खर्च करावा लागणार असल्याने संस्थानच्या तिजोरीवर बोजा
- मंदिर परिसरातील अनागोंदी आणि भाविकांच्या लुटमारीला आळा बसेल.