आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ, तेंडुलकरला अॅम्बेसेडर बनवण्यास शिर्डी ट्रस्टकडून नकार, भाविकांकडून तीव्र विराेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुढील वर्षी साजऱ्या हाेणाऱ्या श्री साईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महानायक अमिताभ बच्चन किंवा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यासारख्या सेलिब्रिटीजना ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याच्या हालचाली शिर्डी संस्थानकडून केल्या जात हाेत्या. मात्र अाता त्यांनी हा विचार साेडून दिला अाहे. ‘भाविकांच्या भावनांचा विचार करून अाम्ही अाता हा विचार बदलत अाहाेत,’ अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डाॅ. सुरेश हावरे यांनी दिली. जुलै महिन्यात शताब्दी साेहळ्याचे नियाेजन करताना देवस्थानच्या कमिटीने सेलिब्रिटींना अॅम्बेसेडर बनवण्याचा मनाेदय व्यक्त केला हाेता, त्यावर हालचालीही सुरू झाल्या हाेत्या. मात्र भाविकांकडून तीव्र विराेध झाला.
बातम्या आणखी आहेत...