आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका शिरीष पै यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ लेखिका, पत्रकार आणि आचार्य अत्रेंच्या कन्या शिरीष पै यांचे आज मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 88 वर्षाच्या होत्या. आज सायंकाळी साडेसात वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात ‘हायकू’ नावाचा कविता प्रकार पै यांनीच आणला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
 
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे.  शिरीष पै यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मुंबईतल्या लॉ कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ मराठा या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले.
 
त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होते. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होते. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली होती. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. 
 
लालन बैरागीण, हे ही दिवस जातील या कादंबऱ्यांचं लिखाण त्यांनी केलं. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची पुस्तकंही गाजली. आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला ही त्यांची ललित साहित्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...