आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात तरूणींवर नोटांची उधळण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याणग्रामीणमधील निळजे गावचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे विभागप्रमुख सत्यवान ऊर्फ सतीश पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नर्तकी तरूणींवर पैशांची उधळपट्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे 'शिवसेनेची हीच का संस्कृती?' असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शिवसेना लोढा हेवन निळजे शाखेतर्फे सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी एक विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिवसभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केल्यानंतर संध्याकाळी मराठी-हिंदी कोळी गीत लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या नर्तिकांवर नोटांची उधळण करण्यात आली.
सत्तेत असलेल्या एका प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्याद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अशा प्रकारे पैशांचा पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र सत्यवान पाटील यांनी या उधळपट्टीच्या आरोपाचे खंडन केले आहे. पाटील म्हणाले, 'मी कोणत्याही नर्तिकेवर पैशांची उधळण केली नसून कार्यक्रमासाठी शहराच्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी पैसे उधळले आहेत. अर्थात पैसे उधळणे योग्य नसल्याने मी त्याबद्दल माफी मागतो. मला बदनाम करण्यासाठी हे विरोधकांचे षड्यंत्र आहे,' असा आरोप त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...