आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shisvena Leader Mohan Raut Murder, Fir Againest Ncp Mla Kisan Kathore

शिवसेनेच्या मोहन राऊत हत्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बदलापूरमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांची काल सकाळी 10 वाजता दोन अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
याप्रकरणी कथोरे यांच्यासह सहा जणांवर राऊत यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
राऊत काल सकाळी पावणेदहाच्या सुमारास बदलापूर शहरातील कात्रप भागातील आपल्या नगरसेवक असलेल्या वहिनींच्या कार्यालयात एकटेच बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी कार्यालयात घुसत राऊत यांच्यावर जवळून गोळ्या घातल्या.
राऊत यांच्या छातीत व पोटात 5 गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना डोंबिवलीच्या एम्स रूग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मारेकरी तोंडाला रूमाल बांधून आले होते. याप्रकरणी आमदार किसन कथोरेंवर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. मोहन राऊत यांची पत्नी विजया राऊत आणि वहिनी शीतल राऊत या दोन्ही कुळगाव बदलापूर पालिकेत सेनेच्या नगरसेविका आहेत.
एका वर्षात बदलापूर शहरात ही गोळीबाराची चौथी घटना आहे. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या एक दिवस आधी बदलापूरात पप्पू बागुल या गुंडाने होळीच्या दिवशी संतोष साळवी या तरूणाची गोळ्या झाडून हत्या केली होती. एका वर्षापूर्वी भाजपचे शरद म्हात्रे यांच्यावरही गोळीबार करण्यात आला होता.