आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shital Mahatre Cleared We Will Never Leaving Shivsena

शिवसेना कधीही सोडणार नाही- शीतल म्हात्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मी शिवसेना पक्ष कधीही सोडणार नाही. आपण आपल्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहू व शिवसैनिक म्हणून जगू, असे शिवसेनेतील नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंनी म्हटले आहे.
शीतल म्हात्रे या शिवसेना सोडण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या माध्यमात आल्या होत्या. त्यावर म्हात्रे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी शीतल म्हात्रे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर म्हात्रे शिवसेना सोडणार असल्याची बातम्या आल्या होत्या.
यावर शीतल म्हात्रे म्हणाल्या, अशा बातम्या पक्षातील काही लोक मुद्दाम पसरवत आहेत. आमदार विनोद घोसाळकरांवर होणारी संभाव्य कारवाई टळावी यासाठी मी पक्ष सोडत असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहे. यामागे षडयंत्र असून, आपण कधीही शिवसेना सोडणार नाही असे ठामपणे सांगत आहोत असे त्या म्हणाल्या.