आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shital Mahatre vinod Ghosalkar Blame Game Still Is Going On

शीतल म्हात्रेंचे आरोप निराधार, अटकपूर्व जामीन घेणार नाही - घोसाळकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटारडे व निराधार आहेत. मी सर्व आरोपांचे खंडन करतो. माझ्याविरोधात काही लोकांनी रचलेले हे षडयंत्र आहे. मी काहीही चुकीचे केले नसून, कोणत्याही सक्षम यंत्रणेद्वारे माझी चौकशी करावी, असे सेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे व माजी महापौर शुभा राऊळ यांच्यासह काही महिला नगरसेविकांनी घोसाळकर यांनी शीतल यांना मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेली तीन-चार दिवस हे प्रकरण एवढे चर्चेला आले की राष्ट्रीय महिला आयोगानेही यात दखल घेतली. म्हात्रे यांच्यासह काही नगरसेविकांनी पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिल्यानंतर घोसाळकर यांच्याविरू्दध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे घोसाळकर अडचणीत आले आहेत. त्यामुळे आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
आणखी पुढे वाचा, घोसाळकर काय म्हणाले...