आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • फेसबुक पोस्ट लाईक केल्याने शिवसैनिकांकडून अंबरनाथमधील कुटुंबाला मारहाण

फेसबुक पोस्ट लाईक केल्याने शिवसैनिकांकडून अंबरनाथमधील कुटुंबाला मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फेसबुक पोस्ट लाईक केल्याच्या कारणामुळे अंबरनाथ येथील एका परिवाराला धमकावणे, मारहाण करणे व काही काळासाठी बांधून ठेवण्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या परिवारातील एक सदस्य पोलिस दलात कार्यरत आहे. तरीही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या दादागिरीपुढे तो काहीही करू शकला नाही.
पीडित परिवार अंबरनाथमधील मातोश्रीनगर येथे राहत आहे. या परिवाराने दिलेल्या तक्रारीनुसार, अंबरनाथ येथील शिवसेना नेता राजू वालेकर यांचा पुतण्या व नगरसेवक निखिल याने या सर्वांना एका मॅरेज हॉलमध्ये बोलावले. त्याठिकाणी आधीच त्याचे काका (राजू वालेकर) आणि 8-10 शिवसैनिक उपस्थित होते. या सर्वांनी मिळून या लोकांना मारहाण केली. तुम्ही शिवसेना व शिवसेना नेत्यांची प्रतिमा खराब करीत आहात, असे सांगत मारहाण केली. पीडित कुटुंबियातील सदस्य मीनाक्षी धुळेकर (42) या जुवेनाइल अॅंड प्रोटेक्शन यूनिटमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रार दिली आहे की, शिवसेना नेते वालेकर यांनी त्यांचा मुलगा राहुल (23), बहिण नयन (22) आणि आई प्रजाक्ता यांना धमकी दिली आहे की, जर तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली तर ठार मारले जाईल.
काय होते फेसबुक पोस्टमध्ये-
अंबरनाथ येथील शिवसेनेचे नेते असलेले राजू वालेकर हे अनधिकृत बांधकाम व्यावसायाशी संबंधित आहेत. राहुल याने सांगितले की, त्याची बहिण नयन हिने एक फेसबुकवरील पोस्टला लाईक केले होते. ही पोस्ट शिवाजी कांबले नावाच्या व्यक्तीने पोस्ट केली होती. यात भ्रष्टाचार आणि शहरात सुरु असलेल्या अनिधकृत बांधकामांबाबत मोहिम राबविण्याची गरज असल्याचे म्हटले होते. फेसबुक पोस्टमध्ये शिवसेना नेते राजू वालेकर व त्यांच्या कुटुंबियांकडून सुरु असलेल्या अनिधकृत बांधकामाचा उल्लेख करण्यात आला होता. नयनने या पोस्टला लाईक केले व कमेंट दिली. पुढे ही बाब ती विसरून गेली.
अशी झाली तक्रार-

मीनाक्षी धुळेकर यांनी पोलिस असूनही याबाबत दोन दिवस तक्रार दिली नाही. ती जेव्हा पोलिसांत गेली तेव्हा तिला भीती घालण्यात आली की, फेसबुक पोस्ट लाईक करणे व त्यावर पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे 6 ऑगस्ट रोजी नयन हिने ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त व्ही व्ही लक्ष्मी नारायण यांची भेट घेतली. पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेतली. याशिवाय घरातील सर्व सदस्यांना बोलवून माहिती घेतली.

शिवसेना नेत्याचे काय म्हणणे आहे?-

राजू वालेकर यांनी सांगितले की, तक्रार केलेल्या कुटुंबातील लोक आमच्या परिचयाचे आहेत. ते आमच्या घराच्या परिसरातच राहतात. मुलांमुलांत आपसात भांडणे झाली होती. मात्र ती आम्ही मिटवली आहेत. हे प्रकरण आता संपले आहे. आम्ही कोणालाही मारहाण केली नाही की धमकी दिली नाही. धुळेकर कुटुंबियांनी केलेले आरोप चुकीचे आहेत व भीतीने केले असू शकतात.
यापूर्वीही घडली होती अशी घटना-

नोव्हेंबर 2012 मध्ये जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा मुंबई बंद होती. त्यावेळी दोन मुलींनी याबाबत फेसबुकवरून टिप्पणी केली होती. यानंतर शिवसेनेने या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोन्हीही मुलींना अटक करण्यात आली होती. यानंतर हे संबंधित मुलीचे कुटुंबिय गुजरातमध्ये शिफ्ट झाले होते.
बातम्या आणखी आहेत...