आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाळासाहेबां\'शिवाय शिवसेनाचा 47 वा वर्धापन दिन; उद्धव करणार मार्गदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचा आज (बुधवारी) 47 वा वर्धापनदिन आहे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यंदाचा वर्धापन दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत. दरम्यान, सोलापूरमधून चार आमदार निवडून आणण्याचा निर्धार वर्धापनदिनानिमीत्त करण्यात आला आहे.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्‍यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचा 47 वा वर्धापन दिन पार पडेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यंदा मनोरंजनाचा कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे पक्षातर्फे कळवण्यात आले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेसमोर आज अनेक आव्हाने आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेल्या असल्या तरी बाळासाहेब ठाकरेंचे नैतिकबळ त्यांच्या पाठिशी होते. मात्र, आता बाळासाहेब हयात नाही. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून सर्व जबाबदारी उद्धव यांच्यावर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव काय करिश्मा दाखवतात याकडे केवळ राज्याचंच नव्हे तर देशाचेही लक्ष लागले आहे.