आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादित्यकडे नेतृत्वगुण,फक्त अनुभवाची गरज; शिवसैनिकांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या पुढील वाटचालीत मोलाचा आणि महत्त्वपूर्ण वाटा उचलतील आणि शिवसेनेला आणखी पुढे नेऊन ठेवतील. मात्र यासाठी आणखी काही वर्षे त्यांना अनुभव घ्यावा लागेल,’ असे मत गोरेगाव येथे जमलेल्या शिवसैनिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच आदित्य यांच्यावर युवा सेनेची जबाबदारी देऊन त्यांना राजकारणात सक्रिय करण्यात अाले अाहे. त्यांच्या रूपाने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी शिवसेनेचे नेतृत्व करत अाहे. रविवारी सुवर्णमहोत्सवी मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करणार होते, परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मागे घेतला. आदित्य यांच्या नेतृत्वाविषयी काही शिवसैनिकांना विचारले असता त्यांनी सकारात्मक विश्वास व्यक्त केला. अंधेरी येथील २८ वर्षीय विनायक पाटे या शिवसैनिकाने सांगितले, ‘आदित्य ठाकरे यांच्याकडे चांगले व्हिजन आहे, मात्र त्यांना आणखी अनुभवाची आवश्यकता आहे. संभाषण कौशल्य वाढवण्याची गरज आहे. या दोन गोष्टी मिळाल्यास ते शिवसेनेची धुरा नक्कीच समर्थपणे सांभाळू शकतील.’

उस्मानाबाद येथील ३२ वर्षीय राकेश कदम म्हणाला, ‘आदित्य स्वभावाने खूप चांगले आहेत. त्यांच्याकडे अनेक नवीन कल्पना आहेत. युवासैनिकांशी ते मिळून मिसळून वागतात. तरुणांना ते आपले वाटतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक तरुण युवा सेनेत येत आहेत. ते शिवसेना आणखी पुढे नक्कीच नेतील.’ सांगलीचा २८ वर्षीय रमेश पाटील म्हणाला, ‘अादित्य यांना पक्ष विकासासाठी आणखी अनुभवाची गरज अाहे.’ उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूरच्या शिवसैनिकांनीही या मताशी सहमती दर्शवली.
बातम्या आणखी आहेत...