आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Announced Its Manitesto, Divya Marathi

शिवसेनेचा गुपचूप जाहीरनामा प्रसिध्‍द, औरंगाबादेत पर्यटन तर नाशिकमध्‍ये धार्मिक केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकीत आकर्षक जाहीरनामे तयार करून गाजावाजा करत ते प्रकाशित केले जातात. मात्र, या वेळी प्रथमच स्वबळावर लढत असलेल्या शिवसेनेने शुक्रवारी गुपचूप आपला वचननामा प्रकाशित करून चकित केले.

उद्धव ठाकरेंनी गुपचूप केले वचननाम्याचे प्रकाशन
* शेतक-यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण, आरोग्य सेवांसाठी योजना राबवणार
* अपूर्ण असलेले सिंचन व पाटबंधा-यांचे लास्ट माइल प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार
* लघुसिंचनासाठी दरवर्षी भरीव तरतूद करणार
* उद्योगांना योग्य दरात २४ तास वीजपुरवठा देऊ
* पुणे-औरंगाबादेत ऑटोमोबाइल व आयटी नगरी म्हणून स्थापना, नाशकात संरक्षण सामग्री उत्पादन तर जळगाव व नाशिकमध्ये अन्न व अन्न प्रक्रियानगरी स्थापन करणार
* एलबीटी रद्द करणार
* शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी
* व्यवसायाभिमुख विषयांचा अभ्यासक्रम
* परदेशातील शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जातील ४ टक्के व्याजाची परतफेड करणार
* ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करणार
औरंगाबाद
* टुरिझम हब म्हणून सर्वांगीण विकास करणार
* खाम नदी व नहर-ए-अंबरीचे पुनरुज्जीवन करणार
* प्रसिद्ध हिमायतबागेचा कृषी उद्यान विकास करू
* शेंद्रा, बिडकीन, वाळूज या औद्योगिक केंद्रांसह शहरासाठी एकात्मिक वाहतूक प्रणाली