आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअरसाठीच्या पाण्यावरून शिवसेना-भाजपत खळखळ; प्रश्न एक, भूमिका दोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भीषण दुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या मराठवाड्यातील बिअर कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच खळखळ सुरू झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी बिअर कंपन्यांचा पाणीपुरवठा तत्काळ खंडित करा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे तर या कंपन्यांचा पाणीपुरवठा तोडणे योग्य नसल्याचे सांगत भाजपने मात्र शिवसेनेच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत सरकारमध्ये असलेल्या शिवसेना- भाजपने एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे असताना परस्परविरोधी भूमिका घेऊन सरकारला या प्रश्नाचे गांभीर्य किती हे दाखवून दिले जात आहे. महत्त्वाच्या प्रश्नावर भाजप शिवसेनेला विचारात घेत नसल्यामुळे त्याचे उट्टे काढण्यासाठी हा वाद आणखी चिघळवला जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.

औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांनी लोकभावना लक्षात घेत मराठवाड्यातील बिअर कंपन्यांचा पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्याची आग्रही भूमिका घेतली. मात्र फडणवीस सरकारमधील ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या मंत्र्यांना महसुलाच्या दृष्टीने ऊस तसेच बिअर कारखान्यांना पाणी देणे महत्त्वाचे वाटत असताना सेनेने मात्र लाेकांच्या बाजूने चूल मांडून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र सेनेच्या उलट भूमिका घेतली. बिअरच्या कारखान्यांना औद्योगिक वापराच्या आरक्षणातून होणारा पाणी पुरवठा बंद करणे चुकीचे आहे. उद्योग खाते शिवसेनेकडे असून सुभाष देसाई यांच्याकडे त्याची जबाबदारी येते, पण अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून दारू कंपन्यांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा अहवाल मागवला आहे. गरज भासल्यास कंपन्यांचे पाणी खंडित करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, .

ते पिण्यासाठी आरक्षित पाणी थोडेच आहे?
बिअर कारखान्यांना दिले जाणारे पाणी काही पिण्यासाठी आरक्षित असलेले नव्हे तर उद्योगासाठी आरक्षित पाणी आहे,त्यामुळे या कारखान्यांचे पाणी बंद करणे योग्य होणार नाही. ते बंद केले तर फार काही फरक पडणार नाही,पण जर पिण्याचे पाणी कारखाने वापरात असतील तर मग असे कारखाने बंद केले पाहिजेत. कारखाने बंद झाले तर अनेक लोकांच्या हाताचे काम बंद होईल, अनेक लोक बेरोजगार होतील, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले अाहे.

पुढे वाचा... दारू महत्त्वाची की जीव, हे ठरवा, उद्योगांची १०, बिअर कंपन्यांची २० टक्के पाणी कपात घाेषित