आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Amit Shah

सामना रंगला: भाजपची \'शाहिरी\' तर शिवसेनेची \'ठाकरी\', अमित शहांनी टाळला नामोल्लेख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य विधानसभेच्या निवडणुका २६ दिवसांवर असतानाच जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप युतीत धुसफूस शिगेला पोहोचली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील तीन सभांत एकट्या भाजपच्याच प्रचाराची शाहिरी करत युती, शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळला. यामुळे तिळपापड झालेल्या शिवसेनेने तिढा मिटवण्यासाठी भाजपने दिलेला १२ तासांचा अल्टिमेटम धुडकावून लावला. पक्षाच्या नेत्यांनी ठाकरी शैलीत भाजपला ठणकावले. गुरुवारी दिवसभराच्या या घडामोडींमुळे २५ वर्षांपासूनची युती तुटण्याचे चित्र निर्माण झाले.

भाजप नेत्यांच्या बुधवारच्या बैठकीनंतर पक्षाने शिवसेनेला अल्टिमेटम दिल्याची बातमी झळकली. पाठोपाठ अमित शहा यांनी कोल्हापूर, पुणे आणि चौंडीच्या सभेत महाराष्ट्र भाजपयुक्त करण्याचा नारा देतानाच राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा केला. त्याच वेळी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. शिवसेनेने अल्टिमेटमला केराची टोपली दाखवली. भाजपसोबत राहायचे की नाही आणि राहिल्यास त्यांना किती जागा द्यायच्या याचे सर्व अधिकार नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना बहाल केले. जागावाटपात महाराष्ट्राचा सन्मान व्हावा.
शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला निर्णय व्हावा, अशी आमची इच्छा असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. कोणताही अल्टिमेटम मिळाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना जे ठरवेल तेच होईल, असे रामदास कदम म्हणाले. एकंदर स्वबळावर लढण्याचा नेत्यांचा सूर असून उद्धव ठाकरे यांनीही त्यास पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शहा यांची सन्मानाशी तडजोड करून जागावाटप मान्य करणार नाही ही भाषाही शिवसेना नेत्यांना झोंबली आहे.
आम्ही दोन पावले समझोत्यासाठी पुढे टाकली आहेत. तुम्ही थोडे पुढे या. जागावाटप करताना भाजपचा सन्मान राखला पािहजे अन् समाधानही झाले पाहिजे.
"भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देऊन शासन व्यवस्था उखडून टाकण्याचे काम शरद पवारांनी केले. त्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार बनवण्याचे काम केले,

महाराष्ट्रातील आघाडी सरकारनेही राज्यात मोठे घोटाळे करून ठेवले आहेत.
* 288 जागांच्या वाटपाचा तिढा
* शिवसेनेचा फॉर्म्युला
१५१ शिवसेनेला
११९ भाजपला
१८ मित्रपक्षांना

* भाजपचा फॉर्म्युला
१३५ शिवसेनेला
१३५ भाजपला
१८ मित्रपक्षांना

* २००९ मधील सूत्र
१६९ शिवसेनेला
११९ भाजपला
(शिवसेना ४४, तर भाजपने ४६ जागा जिंकल्या)

* ५९ जागा शिवसेनेने कधीच जिंकलेल्या नाहीत.
* १९ जागा भाजपने कधीच जिंकलेल्या नाहीत.