आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीत धनुष्य ताणलेलेच, कमळही भूमिकेवर ताठर; शिवसेनेचा १२६ जागांचा नवा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीत सध्या जागावाटपाचे नवनवे फॉर्म्युले एकमेकांकडे विचारासाठी पाठवण्याचा नवाच प्रकार सुरू झाला आहे. शनिवारी शिवसेनेने भाजपकडे नवा फॉर्म्युला पाठवला असून त्यावर विचार करून लवकर उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याचे आमंत्रण दिले आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला १२६ जागा देऊ केल्या असून त्यातूनच महायुतीच्या घटक पक्षांना जागा देण्यास सांगितले आहे.

शनिवारी शिवसेनेने भाजपसमोर १२६ जागांचा नवा प्रस्ताव पाठवला. त्यानुसार शिवसेनेकडे १५५ जागा ठेवून भाजपला १२६ जागा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यातूनच भाजपने घटक पक्षांना जागा द्यायच्या आहेत. शनिवारी दुपारी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि खासदार अनिल देसाईंनी हा प्रस्ताव दिला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगितले. भाजपने नवा प्रस्ताव दिल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर दिली.  दरम्यान शनिवारी दिवसभर शिवसेना आणि भाजपच्या बैठकांचा सिलसिला सुरु होता. त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही.

शिवसेनेची भूमिका
* भाजपने दबावतंत्राचा वापर केला तरी त्यांना शिवसेनेची गरज असल्याने झुकायचे नाही.
* घटक पक्षांना भाजपनेच जागा द्याव्यात.
* स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिवसेना आपल्या कोट्यातील ७ जागा देईल.
* आमचाच फॉर्म्युला योग्य आणि व्यवहार्य असल्याने भाजपने तो निमूटपणे मान्य करावा.
उद्धव आज जाहीर करणार भूमिका  : रविवारी रंगशारदामध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला असून तेथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जागा वाटपाचा निर्णय घोषित करण्याची अपेक्षा आहे.

आज महत्त्वाचा दिवस
रविवारी भाजप पहिली उमेदवार यादी केंद्रीय संसदीय समितीला देणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरे काय संदेश देतात याकडे युतीचे लक्ष लागले आहे.
हाती काय उरते?
शिवसेनेच्या नव्या पर्यायानुसार तीन मित्रपक्षांना जागा सोडल्यानंतर आमच्या हाताशी फक्त ११७ जागा उरतात.
विनोद तावडे, भाजप.