Home | Maharashtra | Mumbai | Shiv sena Candidates Entry in Congress at Mumbai Thane

शिवसैनिक काँग्रेसमध्ये; माणिकराव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

प्रतिनिधी | Update - Mar 10, 2013, 12:28 AM IST

शिवसेनेच्या ठाण्यातील काही कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये केला. या कार्यक्रमात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सेनेचे आणखी काही आमदार-खासदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

  • Shiv sena Candidates Entry in Congress at Mumbai Thane

    मुंबई- शिवसेनेच्या ठाण्यातील काही कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये केला. या कार्यक्रमात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सेनेचे आणखी काही आमदार-खासदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सेनेच्या नाशिकमधील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
    ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक 11 आणि 12चे शाखाप्रमुख संभाजी कुराडे, उपशाखाप्रमुख कृष्णकुमार सिंहसोडारी, सुरेश फोंडेकर आदींनी माणिकरावांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी माणिकराव यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कमकुवत नेतृत्वावर टीका केली. ते म्हणाले , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत वाढलेल्या उद्धव यांना आजवर आपले नेतृत्व सिद्ध करता आलेले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांची अकार्यक्षमताच दिसून आली.
    फाजील आत्मविश्वास
    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली 145 जागांची मागणी आणि स्वबळावर लढण्याची भाषा म्हणजे फाजील आत्मविश्वास असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

Trending