आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Property Argument

संपत्तीची सेटलमेंट नाहीच : उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव ठाकरे यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाची सेटलमेंट न्यायालयाबाहेर केली जाणार नाही, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.
जयदेव ठाकरे यांच्या मागणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात न्यायालयाबाहेर सेटलमेंट करून घ्यावी, असे सुचवले होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी त्यास स्पष्ट नकार दिला आहे. मृत्युपत्र बनवताना बाळासाहेब सक्षम नव्हते. त्यामुळे आपल्यालाही संपत्तीचा वाटा मिळायला हवा, अशी मागणी जयदेव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे वकील राजेश शहा यांनी मंगळवारी न्यायालयात आम्ही कोणतेही सेटलमेंट करणार नसल्याचा युक्तिवाद केला.