आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Ceremony.

दुसरा स्मृतिदिन: राज ठाकरेंनी वाहिली शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली, दोघे बंधू आले एकत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) दुसरा स्मृतिदिन आहे. शिवाजी पार्कवरील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी, पुत्र आदित्य, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी हजर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल साइटवर बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे भाजपचे नेते आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर येणार की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. मैदानावर चोख बंदोबस्त तैनात आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असून राज्यभरातून शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात आले आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार की नाहीत याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र भाजपचे नेते देखील यावेळी उपस्थिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत.

स्मृतिस्थळ फुलांनी सजवले
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनासाठी महापालिकेने स्मृतिस्थळ फुलांनी सजवले आहे. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या परिसरात भगवे झेंडे तसेच बाळासाहेबांना अभिवादन करणारे फलक मोठय़ा प्रमाणात लावण्यात आले आहेत. रविवारीच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक येथे येऊ लागले.

बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून भाजपसह विविध पक्षांचे केंद्रीय व राज्यस्तरीय नेते उपस्थित झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून सेना-भाजपमधील दुरावा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील तसेच केंद्रातील भाजपचे नेते बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यास उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, दोघांची झालेली दिलखुलास भेट... बाळासाहेबांचा फोटो अल्बम...