आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांनी कॅमेऱ्यात टिपलेले शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी शिवसेनेला म्हणाले होते, की आम्ही नांदेड, औरंगाबाद आणि आता मुंबईतही आलो आहेत. तुम्ही हैदराबादला येऊन दाखवा. त्याचा चांगलाच खरपुस समाचार काल उद्धव ठाकरे यांनी घेतला. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, असा सुचक इशाराही दिला. यानंतर एमआयएम आणि शिवसेनेमधील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाय उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रकाश झोतात आले आहेत. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय, उद्धव यांच्या एरिअल फोटोग्राफिचे पॅकेज.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे सामाजिक घडामोडींवर आणि वाईटावर जोरदार मारा करणारी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही चांगले व्यंगचित्रकार आहेत. तेही कुंचल्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेत असतात. आता मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून राज ठाकरे संपादकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र एरिअल फोटोग्राफी या क्षेत्रात रुळले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे अप्रतिम फोटो कॅमेऱ्यात टिपले आहेत. त्यांच्या फोटोतून या किल्ल्यांना एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय उद्धव ठाकरे यांनी एरिअल फोटोग्राफीच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद केलेले या सुंदर दुर्गांचे सौंदर्य. या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यांसमोर प्रकटल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे टिपलेले फोटो...