आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day SPL: बाळासाहेबांचे \'चिरंजीव\' ते शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांचा प्रेरणादायी प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे एक मुरब्बी राजकारणी आणि उत्तम छायाचित्रकार म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. उद्धव यांना एरिअल फोटोग्राफीचा छंद आहे. "पाहावा विठ्ठल" आणि "महाराष्ट्र देश" हे एरिअल छायाचित्रांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे असे ब-याच अभ्यासू व्यक्तिंचे म्हणणे होते. परंतु ते आजपर्यंत शक्य झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात छातीत दुखु लागल्याने उद्धव ठाकरेंना मुंबईतील लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्यांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर चुलतभाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्या गाडीतून घरी सोडण्यास गेले होते. त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव यांच्यातील दुरावा संपल्याची चर्चा रंगली होती. परंतु ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेची जबाबदारी अगदी समर्थपणे संभाळत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत सेनेचे 17 खासदार निवडून आले. विधानसभेतही घवघवीत यश मिळाले. त्याच्या बळावर आज महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेना सहभागी झाली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय, खासगी आणि कौटुंबीक आयुष्या विषयी...