आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Uddhav Thackeray On Sunday Slammed BJP Government

पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू- शिवसेनेची आशिष शेलारांवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचा जन्म फक्त सत्तेसाठी नसून आम्हाला सत्ता हवी आहे ती लोककल्याण, महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्राच्या रक्षणासाठी. याबाबत काही वाकडेतिकडे झाल्यास आम्ही डोळे मिटूनही शत्रूंचा समाचार घेऊ व लोकांच्या अंगावर येऊन चावणार्‍या पिसाळलेल्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करू, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अर्जुनाने डोळे मिटूनच माशाचा डावा डोळा फोडला होता व रावणाने डोळे उघडे ठेवून उचललेले शिवधनुष्य त्याच्याच छाताडावर पडले होते, असे सांगत मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला नक्कीच धोबीपछाड देऊ असेही अप्रत्यक्षरित्या सुचवले आहे.
गेल्या काही दिवसापासून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि शिवसेनेत शाब्दिक वाकयुद्ध सुरु आहे. शिवसेनेच्या प्रत्येक टीकेच्या बाणाला भाजपमधून फक्त आशिष शेलार प्रत्त्युत्तर देत आहेत. मुंबईतील पावसाने तुंबलेली गटारे याच्यापासून सुरु झालेले हे राजकारण आता भारत-पाकिस्तान संबंधापर्यंत येऊन पोहचले आहे. भाजपला फेब्रुवारी 2017 मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढायची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आशिष शेलार हे शिवसेनेवर तुटून पडत आहेत व सेनेच्या धोरणावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यावरून शिवसेना व शेलार यांच्यात शाब्दिक चकमकी सुरु आहेत. अखेर शिवसेनेने सामनात अग्रलेख लिहून शेलारांवर हल्लाबोल करीत आव्हान दिले आहे. अर्जुनाने डोळे मिटूनच माशाचा डावा डोळा फोडला होता व रावणाने डोळे उघडे ठेवून उचललेले शिवधनुष्य त्याच्याच छाताडावर पडले होते, अशाच पद्धतीने शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देईल असे सुचविले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, काही लोकांना डोळे उघडल्यावर हिंदुस्थानच्या खदखदणार्‍या सीमा दिसतात. पाकड्यांचा सदैव सुरू असलेला विश्‍वासघात दिसतो. ज्यांना प्रखर राष्ट्रवादाची व देशभक्तीची दृष्टी आहे त्यांना हेच दिसणार व दिसत राहणार. हा दृष्टिदोष नसून संस्कार आहे, तर काही लोकांना दिवस-रात्र फक्त ‘गटारे’ दिसतात. पाकिस्तानचे आक्रमण महत्त्वाचे की गटारे महत्त्वाची या प्रश्‍नांवर जनमत घेतले तर लोक संस्कार व राष्ट्रभक्तीस उचलून धरतील, पण महाराष्ट्रात व देशातही सध्या एकंदरीत जो गोंधळ चालला आहे तो पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी भावना लोकात निर्माण होऊ नये. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न आम्ही नव्हे तर भाजपच्याच मंत्र्यांनी उचलला आहे. आता त्यांचीही दृष्टी बिघडली आहे असे कुणास वाटत असेल तर हद्द झाली. आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात चिक्की प्रकरण, राज पुरोहित-लोढा यांचे ‘सीडी’ प्रकरण, मंत्र्यांचे ‘डिग्री’ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांच्या ‘नावा’चा घोळ असे अनेक विषय येतील व संपूर्ण अधिवेशन पुन्हा गोंधळात वाहून जाईल. फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर चालले आहे व शिवसेनेला लोकांना जाब द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे, असे सांगत भाजपच्या कारभारावर टीका केली आहे.
पुढे वाचा, आशिष शेलारांवर कोणत्या शब्दात केली आहे जहरी टीका...