आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या सभेची वाट पाहातोय; मुंबईकरांना भाडोत्री माणसे नकोत; उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत नरेंद्र मोदींनी सभा घेऊन दाखवावी. त्यांच्या सभेची वाट पाहातो आहे. मुंबईकरांना शिवसेना हवी आहे. त्यांना भाडोत्री माणसे नको आहेत, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे चांदिवलीत प्रचार सभेला संबोधित करताना भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. 
 
हिंमत असेल तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्यावी. शिवसैनिक त्यांना त्यांची औकात दाखवतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने झंझावाती प्रचार सुरु केला आहे. 25 वर्षांची भाजपसोबतची मैत्री तुटल्यानंतर शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधले आहे.

मुंबईत मोदींची सभा झालीच पाहिजे...
मुंबईकरांना ‍शिवसैनिक हवा आहे. भाडोत्री माणसे नको आहेत. मुंबई मोदींच्या सभेची वाट पाहतो आहे. मोदींच्या सभेनंतरही मुंबईत शिवसेनाच जिंकणार, असा विश्वास देत उद्धव ठाकरे यांनी मोदींना आव्हान दिले आहे. विधानसभेत एक बोलतात, जाहीर सभेत बाहेर दुसरेच बोलतात, अशा मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा काय? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 

महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही
सरकार चालवताना शिवसेनेचा टेकू  हवा असेल तर आधी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या. मुंबईसाठी ही आमची तिसरी – चौथी पिढी काम करते आहे. महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही. मुंबई जेवढा टॅक्स वर्षाला भरते त्यातला 25% आम्हाला द्या बाकीची भीक आम्हाला नको. अस्सल मुंबईकराला शिवसेनाच हवी आहे. विमानतळाचा परिसर आहे, आम्हालाही कळते. आम्हालाही चांगली घर हवी आहे. तुमची दुकाने चालवायची म्हणून विकासाची वीट रचू देणार नसल्याचा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...