आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मन दुखावले तर पदरात काय पडते हे वांद्रयातील निकालावरुन स्पष्ट झाले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. कोणाचा पराभव झाला, याला महत्त्व नाही तर वांद्रयात निष्ठेचा विजय झाला आहे. निष्ठावान शिवसैनिकांनी आणि मतदारांनी दाखवलेल्या प्रेमाचा हा विजय आहे. आशीर्वाद देणारे हात आणि आशीर्वाद देणारे मन नेहमीच लक्षात ठेवा. ते जर दुखावले गेले तर पदरात काय पडते हे वांद्रयातील निकालावरुन स्पष्ट झाले आहे. शिवसेना हा वाघ आहे आणि वाघांच्या नादाला लागू नका', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना इशारा दिला.

वांद्रयात नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा फडकला .या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्‍ट्राचे लक्ष लागले होते. शिवसेना- भाजप- रिपाइं महायुतीच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांचा दारूण पराभव केला. तसेच विखारी प्रचार करणार्‍या एमआयएमच्या उमेदवाराचा धुव्वा उडवाला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 'मातोश्री'वर विजयी उमेदवार तृप्ती सावंत यांचे स्वागत केले. तृप्ती सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नारायण राणेंच्या पराभवानंतर शिवसेनेने असा केला जल्लोष...