आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Corporator Mohan Raut Shot Dead Near Mumbai Today Morning

बदलापूरमध्ये शिवसेना नेते मोहन राऊतांची गोळ्या घालून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बदलापूर येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख मोहन राऊत यांची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांच्यावर कात्रप चौकातील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मोहन राऊत गंभीर जखमी झाले होते.
राऊत यांना उल्हासनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांनी त्यांना मुंबईकडे हलविण्याची सूचना केली. मात्र, मुंबईतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना राऊत यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राऊत यांच्या हत्येमुळे बदलापूर बंदची हाक सर्वपक्षीयांनी दिली आहे. दुपारी 1 पासून बदलापूर बंद आहे.
राऊत यांच्यावर कोणी व का हल्ला केला व या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. तसेच किती हल्लेखोर होते याबाबत काहीही माहिती पुढे आली नाही. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.