आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Dasara Melava, Uddhav Thackeray Attack Pawar

शिवतीर्थावर उमटली मनोहर जोशींविरोधी लाट, व्यासपिठावरून उतरावे लागले खाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवतीर्थावर झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्यात पक्षातील अंतर्गत राजकारणाचे पडसाद उमटले. शिवसैनिकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीनंतर मनोहर जोशी यांना व्यासपिठावरून खाली उतरावे लागले. आदित्य ठाकरे, रामदास कदम यांची भाषणे रद्द करून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरवात केली.

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे असेही सुचविले होते. त्यावर शिवसेनेत संतप्त पडसाद उमटले होते. त्यानंतर शिवसेनेची दसरा मेळाव्याच्या रुपात झालेली ही पहिलीच जाहीर सभा आहे.

यावेळी मनोहर जोशी व्यासपिठावर आल्यावर शिवसैनिकांनी जोरदार नारेबाजी करीत आपला संताप व्यक्त करण्यात सुरवात केली. त्यामुळे मनोहर जोशी यांना व्यासपिठावरून खाली उतरावे लागले. जोशी लगेच मेळावा सोडून गेले, असे समजते. मनोहर जोशी यांच्यानंतर आदित्य ठाकरे आणि रामदास कदम यांची भाषणे होणार होती. परंतु, ती आयत्यावेळी रद्द करून उद्धव ठाकरे यांनी माईकचा ताबा घेतला.

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केला जोरदार हल्ला, वाचा पुढील स्लाईडवर..