आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Disrupt Performance By Pakistani Sufi Singer In New Delhi

शिवसेनेची निर्मात्यांना तंबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन अमाप प्रसिद्धी मिळवतात, पैसा कमावतात आणि पाकिस्तानात जाऊन भारताविरोधी मुक्ताफळे उधळतात. त्यामुळे अशा पाकिस्तानी कलाकारांना जर कोणत्याही भारतीय निर्मात्याने बोलावले तर त्या निर्मात्यांना शिवसेने स्टाइलने धडा शिकवला जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी दिला आहे. तसेच यूपीएससी परीक्षेत केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषा वापरण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला स्थगिती मिळवण्यात शिवसेनेचा वाटा असून शिवसेना मराठी भाषेसाठी यापुढेही संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीचे आंदोलन यशस्वी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषांमधूनच देता येतील हा आयोगाचे अध्यक्ष डी. पी. अग्रवाल यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती मिळवण्यात शिवसेनेच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी या वेळी केला. यासाठी शिवसेनेने मुंबईत सात ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने केली होती. त्याची दखल घेत संजय राऊत आणि अनंत गिते यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला.