आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैतापूर प्रकल्पावर शिवसेना आक्रामक भूमिका घेणार, मातोश्रीवर झाली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पावर आता आक्रामक भूमिका घेतली जाईल, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत या प्रकल्पावरुन भाजपला टार्गेट करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांनी बोळवण केल्याने उद्धव ठाकरे चांगलेच चिडले असल्याचे वृत्त आहे.
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर खासदारांनी दिल्लीत मोदींची भेट घेतली होती. यासाठी त्यांना बरीच प्रतिक्षा करावी लागली होती. या भेटीत मोदींनी बघतो, करतो अशी भूमिका घेत खासदरांची चांगलीच बोळवण केली.
दरम्यान, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना शिवसेनेचा आधिपासून विरोध राहिला आहे. काही राजकीय कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्याने सामने होणार असल्याचे दिसून येत आहे. यावरही मातोश्रीवर चर्चा झाली असल्याचे समजते.
पुढील वर्ष शिवसेनेसाठी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे भविष्यात स्वबळावर निवडणुका लढता येतील का, यावर यावेळी विचार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या बैठकीला रामदास कदम, सुभाष देसाई, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.