आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Make Agenda Overcome BJP, Uddhav Divided Reponsibility To Leaders

भाजपवर कुरघोडीसाठी शिवसेनेचा छुपा अजेंडा, पक्षवाढीसाठी उद्धव यांचा नेत्यांवर जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात सत्तेवर येताच पक्ष विस्ताराबाबत भाजपने अवलंबलेल्या आक्रमक धोरणाला शह देण्यासाठी शिवसेनेने एक गुप्त योजना आखली आहे. यासाठी एक दोन कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला असून शिवसेनेतील गळती थांबवणे आणि सत्तेचा वापर करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे या दोन मुद्द्यांवर शिवसेना आगामी काळात काम करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील निवडक नेत्यांवर या कार्यक्रमाची जबाबदारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने आता 'शत प्रतिशत भाजप'या ध्येयाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या राज्यात सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून येत्या मार्चअखेरीस तब्बल एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर पक्षांतल्या नाराज आणि असंतुष्ट नेत्यांना पक्षात घेण्याचा धडाकाही भाजपच्या नेतृत्वाने लावला आहे. त्यामुळे आक्रमकपणे सुरू असलेली भाजपची ही वाढ आपल्या मुळावर येऊ शकते ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेनेही आपला एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या योजनेनुसार पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुढे वाचा गळती रोखण्याला असेल प्राधान्य