आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने शनिवारी महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना भवनात शनिवारी सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीला उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व नेते आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थीत रहाणार आहेत. 
बैठकीत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची रणनीती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (84) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने 82 जागांवर कमळ फुलवले आहे. महापालिकेत युती तोडल्यानंतर भाजपने प्रथमच एवढ्या जागा पटकावल्या आहेत. मुंबईचा महापौर कुणाचा? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतात काय, याचीही  चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, 4 अपक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगत भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. तर शिवसेना पत्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा महापौरच काय पुढचा मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल, असे म्हणत वेगळ्या समिकरणांचे संकेत दिले होते. 
बातम्या आणखी आहेत...