आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपांची चौकशी करा : अर्जुन खोतकर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर आणि व्यक्तिश: केलेले आरोप बिनबुडाचे असून याची निप:क्ष चौकशी करण्याची मागणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीसांकडे केली.

मुख्यमंत्र्यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांनी तसे निवेदन दिले. आपच्या वतीने मंगळवारी मुंबई येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत खोतकर आणि जालना बाजार समितीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बाजार समितीचे दीडशे गाळे नियमबाह्य विकून ५०० कोटींची मालमत्ता उभी केल्याचा प्रमुख आरोप यात होता. यावर लेखा परीक्षकांनीही ताशेरे ओढल्याचा दावाही आपने केला होता.
या आरोपांच्या पार्श्वभुमीवर अर्जून खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक निवेदन दिले. निवेदनासोबत त्यांनी आपल्यावरील आरोपांचे खुलासे करणारे काही पुरावेही दिल्याचे समजते.

१९९० सालापासून आपण आमदार असून २००८ पासून आपण जालना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर काम करत आहोत. या संपुर्ण कालावधीत आपण प्रामाणिकपणे काम केल्याचा दावा त्यांनी या निवेदनाद्वारे केला आहे. तसेच या आरोपांमुळे आपली बदनामी झाली असून या आरोपांची चौकशी होण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे आपल्या विनंतीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. या भेटीनंतर खोतकर यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...