आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MLA Diwakar Rawate Supended In State Assembly

शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते तर मनसेच प्रवीण दरेकर निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभेत मुख्यमंत्र्यांविरुद्ध तर विधान परिषदेत सभापतींना अपशब्द वापरल्याने मनसे आमदार प्रवीण दरेकर व शिवसेनेचे दिवाकर रावते यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. दरेकर यांना एक वर्षासाठी तर रावतेंना डिसेंबरअखेरपर्यंत निलंबित करण्यात आले.

विधानसभेमध्ये मुंबईच्या प्रश्नांवरील चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला. सभागृहाच्या बाहेर दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरला. दुसरीकडे, सिंचनप्रश्नावर विधान परिषद सभापतींच्या बैठकीत रावते यांनी अपशब्द वापरला. दरम्यान, दरेकर यांनी मात्र अपशब्द वापरले नसल्याचा दावा केला.