शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विशेष अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आधीच जोरदार टीका केली आहे. खडसे यांना हिरवी टोपी भेट देणार असल्याचे सांगत, रावते म्हणाले, 'शिक्षणाशी काहीही संबंध नसलेल्या खडसे मियाँनी मराठी शाळांमध्ये उर्दू विषयाला मान्यता देण्याचे सुतोवाच केले आहे. उर्दू शिकणारा एक मुस्लिम विद्यार्थी असला तरी ते त्याच्यासाठी शिक्षकाची नेमणूक करतील. मग त्याला नमाजासाठी शाळेत मशिद तयार करतील आणि शुक्रवारी दुपारची सुटीही जाहीर करतील.' खडसेच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेना त्यांना हिरव्या टोपीची भेट देणार आहे.
शिवसेना नेत्यांच्या या उपरोधिक टीकेमुळे भाजप - शिवसेनेत सत्ता वाटपाचे गणित जुळले नसल्याचे चित्र आहे. आज नवनिर्वाचित आमदारांचा सभागृहात शपथविधी सुरु आहे. त्यानंतर बुधवारी (12 नोव्हेंबर) भाजप सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. तेव्हा शिवसेना काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागले आहे.
काँग्रेस करणार विरोधी पक्षनेते पदावर दावा
काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड केली आहे. तर, उपनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. याची माहिती पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली. काँग्रेस सोमवारी आमदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे. काँग्रेसकडे 42 आमदार आहेत. संख्याबळाच्या तुलनेत ते तिसर्या क्रमांकावर आहेत. मात्र असे असतानाही विरोधी पक्षनेतेपद
आपल्याला मिळेल असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे.
पुढील स्लाइडमध्ये, शिवसेना - भाजप बोलणी थांबली-निलम गोर्हे