आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MNS Come Together In Mumbai Municipal Corporation, Divya Marathi

मुंबई महापालिकेत शिवसेना-मनसे युतीची गणिते ! भाजपने पाठिंबा काढल्यास मिळेल राजचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना व मनसे एकत्र येण्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेतही सत्ता बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपपासून फारकत घेऊन मनसेच्या मदतीने महापालिकेत सत्ता कायम ठेवण्याबाबत शिवसेना गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत बहुमतासाठी ११४ नगरसेवकांची गरज आहे. सध्या शिवसेनेचे ७५ नगरसेवक असून त्यांना १३ अपक्ष, अखिल भारतीय सेनेच्या २, रिपाइं व भारिपच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा पाठिंबा आहे. भाजपचे ३१ नगरसेवक आहेत. म्हणजे भाजप व मित्रपक्षांसह शिवसेनेचे सध्याचे संख्याबळ १२३ आहे. आता विधानसभेनंतर भाजपने पाठिंबा काढून घेतला तर शिवसेनेचे संख्याबळ ९२ वर म्हणजे अल्पमतात येते. त्याच वेळी मनसेच्या २७ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास संख्याबळ पुन्हा शिवसेना ११९ सदस्यांसह बहुमतात येऊ शकते.

पक्षीय बलाबल
मुंबई पालिकेतील सदस्य संख्या (एकूण २२७) - शिवसेना ७५, काँग्रेस ५२, भाजप ३१, मनसे २७, राष्ट्रवादी १३, समाजवादी पार्टी ९, अपक्षांचा गट १३, अखिल भारतीय सेना २, रिपाइं १, भारिप १, अपक्ष पुरस्कृत गट ३.