आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MNS News In Marathi, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Divya Marathi

थीम पार्कवरून मनसे-शिवसेनेत धुसफूस सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे हा पक्ष काढल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्ते आले. परंतु मनसेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलुंड येथील थीम पार्क हे या वादाचे ताजे उदाहरण आहे. वादामुळेच मनसेप्रमुख राज ठाकरे थीम पार्कचे भूमिपूजन करून न बोलताच निघून गेले. िमठागराच्या जागेवर हा पार्क उभा असल्याने मनसे-सेना संबंधात पुन्हा एकदा मिठाचा खडा पडला आहे.

भांडुप येथे मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी थीम पार्क बनवण्याची योजना आखली आहे. खरे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेसकोर्स येथे थीम पार्क बनवण्याची योजना आखली आहे. परंतु त्यापूर्वीच बाजी मारण्याचा प्रयत्न करीत मनसेने मुलुंड येथे थीम पार्कची तयारी सुरू केली. या थीम पार्कच्या भूिमपूजनचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला.
परंतु सकाळपासूनच शिवसेनेने याच्यािवरोधात आंदोलन सुरू केले. शिवसेनेचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी थीम पार्कचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार केली. दत्ता दळवी यांनी सांिगतले, मनसेचे थीम पार्क िमठागराच्या जागेवर बांधण्यात येत आहे. ही जमीन ९९ वर्षांच्या लीजवर असून २०१६ मध्ये ही लीज संपत आहे. त्यामुळे हे थीम पार्क अनधिकृत असल्यानेच आम्ही शुक्रवारीच कांजूरमार्ग पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली आहे. मनसे आमदार मंगेश सांगळे यांनी मात्र या आरोपाचा इनकार करत सांिगतले की, केवळ राजकीय सुडापोटीच असा आरोप केला जात आहे.

शिवसेना-मनसे वादाचा इितहास
* राज ठाकरे यांनी भाडे नाकारणाऱ्या िरक्षाचालकांिवरोधात आंदोलनाचे आदेश २०११ मध्ये िदले. नंतर मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षांची तोडफोड केली. तेव्हा संजय राऊत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनीच तोडफोड केल्याचे सांगून श्रेय लाटले.
* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे नव्हे तर इंदू िमलमध्ये तयार करावे, असे मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी म्हटले आणि सेना-मनसेत मोठा वाद झाला.
* डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या हस्ते आचार्य अत्रे वाचनालयाचे उद्घाटन आणि हरकिशनदास हॉस्पिटलचे भूिमपूजन होणार होते, परंतु त्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे दोन्ही कार्यक्रम उरकून घेतले.
* भांडुप येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मनसे आमदार शिशिर शिंदे यांनी पुढाकार घेऊन मनपाला अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद करावयात लावली. नंतर लगेचच महापौर सुनील प्रभू यांनी हॉस्पिटलच्या भूिमपूजनाचा कार्यक्रम ठरवला.