आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेेनेचा प्रचार करणाऱ्या जैन मुनींची अाता शिवसेनेकडूनच वादग्रस्त झाकीर नाईकशी तुलना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘भाजपने मीरा- भाईंदर महापालिका निवडणूक मनी आणि मुनींच्या जोरावर  जिंकली.  जैन मुनींनी या निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. धार्मिक व्यक्तीने प्रचार करणे हा आचारसंहितेचा भंग असून भाजपला मिळालेली मते रद्द करावीत, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवडणूक आयोगाकडे करणार अाहे,’ असे  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले.
 
इतकेच नव्हे, तर राऊत यांनी जैन मुनींची तुलना ‘इसिस’शी संबंधाचा अाराेप असलेला मुस्लिमधर्मीय प्रवचनकार झाकीर नाईकशी केली. दरम्यान, या वक्तव्याबद्दल भाजप व जैन संघटनांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, आचार्य नयनपद्म स्वामी यांनी या टीकेवर काहीही बाेलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे ज्या आचार्य नयनपद्म स्वामींवर संजय राऊत यांनी टीका केली त्याच जैन मुनींनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी प्रचार केला होता.   

मीरा- भाईंदर निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले व शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. या निकालाबाबत राऊत म्हणाले, ‘भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर निवडणूक जिंकली. भाजपचा हा विजय महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारा आहे. जामा मशिदीचे इमाम असे फतवे काढत होते. तसेच फतवे जैन मुनींनी काढले. ज्यांनी असे फतवे काढले ते राजकीय गुंड आहेत. त्यांची तुलना मी झाकीर नाईकशी करतो. हा धार्मिक प्रचार आचारसंहितेचा भंग आहे. यासंदर्भात आम्ही केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहोत. अशा धार्मिक गुरूंमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होत आहे.

आमच्या प्रत्येक कार्यात जैन समाज सहभागी झालेला आहे. शांतताप्रिय असा हा समाज आहे. मात्र, मीरा- भाईंदरमध्ये ज्या प्रकारे जैन मुनींनी गरळ ओकली तीदेखील एक प्रकारे हिंसा आहे,’ असे राऊत  म्हणाले.
 
पराभवाची सवय करून घ्या : साेमय्या  
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार किरीट साेमय्या यांनी टीका केली. ‘मीरा- भाईंदरचा पराभव आमच्या मित्र पक्षाला बराच जिव्हारी लागलेला दिसतोय. त्यांना अशा पराभवांची सवय करून घ्यावी लागणार आहे. जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. अहंकार आणि धमक्यांच्या जोरावर जनतेचा विश्वास जिंकता येत नाही,’ असेही सोमय्या यांनी म्हटले. 
 
लोकांनी नाकारल्याचा विचार करा : भंडारी
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू अाहे. मीरा- भाईंदरमध्ये शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर करताना केली.
 
जैन संघटनेकडून निषेध : संजय राऊत यांनी जैन मुनींविषयी केलेले वक्तव्य अशाेभनीय अाहे, ते त्यांनी त्वरित मागे घ्यावे व मुनींची माफी मागावी, अशी मागणी करून अाॅल इंडिया जैन मायनाेरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.
 
पुढील स्‍लाइडवर... काय म्‍हणाले होते मुनी?
बातम्या आणखी आहेत...