आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या गुगलीने भाजपसमोर पेच; कृषितज्ज्ञ डॉ.स्वामिनाथन यांचे नाव केले पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रपतिपदासाठी मोहन भागवत यांच्या नावाला आमची पहिली पसंती आहे. मात्र, त्यांच्या नावाला कोणी आक्षेप घेत असेल तर कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी करत भाजपसमोर चांगलाच पेच निर्माण केला आहे.
 
शिवसेना सुरुवातीपासूनच मोहन भागवत यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी करत आहे.  मात्र, स्वतः मोहन भागवत यांनीच राष्ट्रपतिपदास नकार दिल्याने आता सेनेने स्वामिनाथन यांचे नाव पुढे करून नवी खेळी केली आहे.    
 
राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होणार असून उमेदवाराच्या नावावर एकमत व्हावे म्हणून भाजप नेते प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जात आहे. रविवारी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरे यांची यासाठीच भेट घेणार आहेत.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील सर्वच शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी आग्रही आहेत. त्यामुळे स्वामिनाथन यांनाच राष्ट्रपती केले तर देशातील शेतकऱ्यांसाठी तो एक चांगला निर्णय असेल. एवढेच नव्हे तर भाजपकडे एखादे नाव असेल तर त्याचाही विचार करू. राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.   

पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले, शेतकऱ्यांचे हे प्रेम आहे, आशीर्वाद म्हणूनच मी सन्मान स्वीकारतो. तुम्ही माझा इथे सत्कार केला. मात्र, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार मानायला मी पुणतांब्याला येईन.

सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी  
जिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने बँका पैसे देऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. ठाकरे म्हणाले, जिल्हा बँकांमधल्या पैशाबद्दल सरकारने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. शेतकऱ्यांनी स्वतःला दुर्बल समजू नये. शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, म्हणून मी मध्यावधीला विरोध करतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
कोण आहेत स्वामीनाथन? वाचा... पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...