आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MP Vinayak Raut And Sant Xavier School Controversy

‘सामाजिक दैत्य' खासदाराला ‘सुबुद्धी दे’, मुंबईतील शाळांत म्हणायला लावली जाते प्रार्थना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाळेच्या विरोधात शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्याच्या रागातून मुंबईतील शिक्षण संस्थेने आपल्या शाळांत चक्क शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात मुलांना प्रार्थना म्हणायला लावण्याचा प्रकार केला आहे. राऊत हे एक ‘सामाजिक दैत्य' आहेत. हे ईश्वरा, त्यांना त्यांच्या कारवायांमध्ये यश येऊ देऊ नको, अशा आशयाची ही प्रार्थना असल्याची लेखी माहिती काही शिक्षकांनीच शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

‘झेवियर्स ग्रुप ऑफ स्कूल’ संस्थेच्या मुंबईतील शाळांत कमी पगारावर राबवले जात असल्याची तक्रार काही वर्षांपूर्वी शिक्षकांनी शिक्षक सेनेकडे केली होती. त्यावरून सेनेने संस्थेविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावरून शिक्षक सेना व शिक्षण संस्थेत जुंपली आहे.
खासदार राऊत म्हणाले, संस्थेने अजून सहावा वेतन आयोग सोडा, पाचवाही लागू केलेला नाही. त्याविरोधात आम्ही तक्रार केल्यानंतर गेल्या आठवड्यात संस्थेच्या १९ शाळांना शिक्षण विभागाने नोटिसा पाठवल्या. सहावा वेतन आयोग दिला नाही तर दहावी -बारावीची मान्यता रद्द करू, असे त्यात बजावले आहे. त्यामुळेच संस्थेने माझ्या विरोधात हे पाऊल उचलले असावे.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने आपण दिल्लीत असून मुंबईत परतल्यानंतर या विरोधात काय कायदेशीर कारवाई करता येईल याची चाचपणी करू, असेही ते म्हणाले.
शिक्षकही आंदोलनाच्या पवित्र्यात
अभ्यंकर यांनी शिवसेना भवनात बुधवारी ‘झेवियर्स ग्रुप आॅफ स्कुल्स’च्या शिक्षकांच्या बैठकीत व्यवस्थापनाविरोधात आंदोलनाची रणनिती ठरवली अाहे. उद्यापासून दोन दिवस सर्व शाळांमधील शिक्षक काळ्याफिती लावून काम करतील. तरीही प्रार्थनेस उत्तेजन देणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई न झाल्यास पुढचे दोन दिवस शाळांच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आणि बोंबाबोंब आंदोलनही करण्यात येणार असल्याची माहिती अभ्यंकर यांनी दिली.
राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध रचलेले हे षड‌्यंत्र अाहे. गेली कित्येक वर्षे ‘हे ईश्वरा आम्हाला क्षमा कर' अशी आमची प्रार्थना असून त्यात बदल झालेला नाही, असे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले. संस्थेची भूमिका मांडणारे पत्रकच शाळेने प्रसिद्ध केल्याची माहिती व्यवस्थापनातील प्रेम शेट्टी या कर्मचाऱ्याने दिली.

धार्मिक भेदभाव, प्रार्थना झाली...
शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर म्हणाले, शाळेत ख्रिस्तीविरुद्ध इतर कर्मचारी असा भेदभाव होताे. २०-२० वर्षे सेवेत असलेल्या इतर धर्मीयांना २० हजारांच्या घरात पगार आहे. ‘राऊत हे एक सामाजिक दैत्य असून ते आपल्या संस्थेच्या मुळावर उठले आहेत. मात्र ईश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी व त्यांच्या या कृत्यात त्यांना ईश्वराने साथ देऊ नये, अशी प्रार्थना संस्थेच्या सात ते आठ शाळांमध्ये तीन-चार दिवस झाली.