आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Editorial In Saamana, Congress

कॉंग्रेसी युवराजांचे गाल फसकन फुटतील, सेनेची राहुल गांधींवर सडकून टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसची हवा गेल्याने या पक्षाला उमेदवार सापडत नाहीत. दिल्लीत पुन्हा युपीएचेच सरकार येईल आणि कॉंग्रेस पक्षाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फुगवलेला फुगा फुटेल आणि युवराजांचे गाल फसकन आत येतील, या शब्दांत सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधी यांच्यावर सडकून प्रहार करण्यात आला आहे. निवडणुकीत रालोआला 275 जागा मिळणार असल्याचा विश्वास यात व्यक्त करण्यात आला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे, की कॉंग्रेसला 200 जागा मिळणार असल्याचा दावा युवराजांकडून करण्यात येत आहे. परंतु, यावर त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्यासाठी असे फुगे फुगवावे लागतात. परंतु, आता कॉंग्रेसच्या फुग्याला अनेक भोके पडलेली आहेत. या करामतीत युवराजांचे गाल मात्र फुगतील आणि फसकन फुटतील. कॉंग्रेसला या निवडणुकीत 100 जागा मिळण्याचीही शक्यता नाही.
परंतु, दुसरीकडे मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआला 275 जागा नक्किच मिळतील. कॉंग्रेस आणि त्यांचे छुपे समर्थक औषधालाही उरणार नाहीत. केजरीवाल यांचा पक्ष तर निवडणुकीनंतर दिसणारही नाही. विजयाची स्वप्ने अनेकांना पडत आहेत. परंतु, त्यातील अनेक निवडणूक निकालानंतर खडबडून जागे होतील.