आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Osmanabad, Nashik , Lok Sabha Election

उस्मानाबादेत रवी गायकवाड, नाशकातून गोडसेंना श‍िवसेनेची उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे, तर उस्मानाबादमधून रवी गायकवाड यांना शिवसेनेने शुक्रवारी उमेदवारी जाहीर केली. मनसेमधून परतलेल्या गोडसे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. तर राष्‍ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी पक्षाने गायकवाड यांना पुन्हा संधी दिली आहे. मागील वेळी गायकवाड यांचा निसटता पराभव झाला होता.


गोडसे व गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या उमेदवारांची संख्या 19 वर गेलीय. मावळमध्ये विद्यमान खासदार गजानन बाबर यांना पुन्हा संधी द्यायची की नाही, याचा निर्णय झालेला नसल्याने उमेदवारी जाहीर झालेली नाही.


नाशकात चुरस वाढणार
हेमंत गोडसेंच्या रूपाने मनसेला उत्तम संघटक लाभला होता. मात्र मनसेतील बदलती परिस्थिती गोडसेंना न मानवल्यामुळे त्यांनी शिवसेनेला आपलेसे केले. मागच्या लोकसभा निवडणुकीत गोडसे मनसेकडून लढले होते. भुजबळ व गोडसे यांना आम आदमी पार्टीच्या विजय पांढरे यांची टक्कर असल्याने नाशिकमधील लढत अतिशय रंगतदार ठरेल.


डॉक्टरांना तगडी स्पर्धा
उस्मानाबादमध्ये राष्‍ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. पद्मसिंह यांना टक्कर द्यायची असेल तर शिवसेनेला तितकाच ताकदीचा उमदेवार हवा होता. रवी गायकवाड यांनी मागच्या खेपेस उमेदवारी देऊन सेनेने तगडा पर्याय दिला होता. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी गायकवाड यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना जागा देण्याचा विचार सुरू होता. मात्र शेवटच्या क्षणी गायकवाड यांना पुन्हा संधी देण्याचे निश्चित झाले.