आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी, बिहारमध्येही शिवसेना निवडणूक लढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेने उत्तर प्रदेश, बिहार तसेच दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि वाराणसीमधून नरेंद्र मोदी व लखनऊतून भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहांविरोधात पक्ष उमेदवार उभे करणार नाही.


शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘भाजपसोबत आमची युती महाराष्‍ट्रात आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये नाही. आम्ही देशाच्या अन्य भागांतही पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेने उत्तर प्रदेशात 20 उमेदवार तर बिहारमध्ये पाच व दिल्लीतील सातही जागांवर उमेदवार देण्याचे ठरवले आहे.’ अर्थात पक्षाने अद्यापपर्यंत वरील राज्यांतील कोणत्याच उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘शिवसेना मोदी (वाराणसी) व राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाही.’


शिवसेनेबरोबरचे संबंध अतूट : राजनाथ
भाजप आणि शिवसेनेतील नाते अतूट आहे, असे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्यामुळे संबंधात तणाव येईल काय, असे विचारले असता राजनाथ म्हणाले की, शिवसेना मोदींच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही, याची मला खात्री आहे. काही समस्या निर्माण झाली तर आम्ही शिवसेना नेत्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढू.


मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमध्ये गेले? लोकसभा निवडणुकीनंतर उत्तराखंडमध्ये सत्तापरिवर्तन शक्य आहे. तसे झाल्यास सतपाल महाराज मुख्यमंत्री बनू शकतात. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसभेत काँग्रेसचे 33 आणि भाजपचे 30 आमदार आहेत. पत्नी अमृता रावत यांच्याशिवाय जवळपास सहा आमदार सतपाल महाराजांच्या सांगण्यावरून काँग्रेस सोडू शकतात. सहकारी पक्ष पीडीएफचे नेते प्रसाद नैथानी यांची जवळीकही काँग्रेसच्या अडचणी वाढवू शकते. भाजपचे दोन माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी व रमेश पोखरियाल निशंक निवडणूक लढवत आहेत.


एन. के. सिंह यांनी जदयू सोडला, भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता
जदयूचे खासदार एन. के. सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात. 73 वर्षीय सिंह माजी सनदी अधिकारी आहेत. राज्यसभा सदस्यत्वाची त्यांची मुदत संपत आली आहे. सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली. जदयूची भाजपसोबतची युती संपुष्टात आल्यापासून सिंह नाराज होते.