आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड महाराष्ट्राबाबत काँग्रेसच्या ठरावाला पाठिंब्यास शिवसेनेचा अखेरच्या क्षणी नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळात उद्भवलेल्या स्वतंत्र विदर्भाचा वादानंतर अखंड महाराष्ट्राचा ठराव सभागृहात मांडण्याचे नियाेजन काँग्रेसतर्फे करण्यात अाले अाहे. वेगळ्या विदर्भाला विराेध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेनेही या ठरावाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. शिवसेनेने प्रथम त्याला होकार दिला, परंतु नंतर मात्र अचानक घूमजाव केल्याने काँग्रेस तोंडघशी पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला असतानाही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शिवसेनेने निर्णय बदलल्याची तक्रार काँग्रेसच्या व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केली.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘विधानसभेत अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याचे सोमवारी ठरवण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने या ठरावासाठी पाठिंबा द्यावा असेही ठरले. शिवसेनेने ते मान्यही केले होते. त्यानुसार सभागृहात ठराव मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु शिवसेनेने ऐनवेळी कच खाल्ली आणि ठरावाला पाठिंबा दिला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा देतो असे सांगितले हाेते. त्यामुळे या ठरावावर विजय आवटी, प्रकाश आबिटकर आणि वैभव नाईक या शिवसेना अामदारांची नावे टाकण्यात आली होती. परंतु त्यांनी सही केली नाही. मात्र तरीही हार न मानता बुधवारी हा ठराव आम्ही पुन्हा सभागृहात सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अध्यक्षांना ठरावाची प्रत दिली जाणार आहे.’ राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने याबाबत सांगितले, ‘सकाळी इथेच माझ्या दालनात शिवसेना नेते आले होते. त्यांनी ठरावाला पाठिंबा देतो असे सांगितले आणि अचानक पाठ फिरवली. कदाचित मुख्यमंत्र्यांनी त्यांना धमकी दिली असेल वा काही तरी सेटिंग झाले असेल,’ असा आरोपही या नेत्याने केला.
पुढे वाचा...
> शिवसेनेची भाजपशी ‘मांडवली’ : विखे
> तुमची हाेते बातमी, पण आमचे मरण : शिवसेना
> ठरावच अाणता येत नाही : मुख्यमंत्री
> काँग्रेसनेच दिला होता स्वतंत्र विदर्भाचा ठराव, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
बातम्या आणखी आहेत...