आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आता क्रिकेटच्या मैदानावर; दोन क्लब घेतले विकत, 10 खरेदीच्या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई क्रिकेट संघटनेवर (एमसीए) वर्चस्व सिद्ध करण्‍यासाठी शिवसेना क्रिकेटच्या मैदानावर उतणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दोन एमसीए क्लब खरेदी केले आहे. मेरी क्रिकेटर्स आणि यंग फ्रेंडस् यूनियन क्रिकेट क्लब, अशी या क्लबची नावे आहे. शिवसेना आणखी 10 क्लब खरेदी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
एमसीएच्या इतिहासात पहिल्यांदा एका राजकीय पक्षाने क्रिकेट क्लब खरेदी केला आहे. यापूर्वी एमसीएचे अध्यक्षपद राष्‍ट्रवादी कॉंग्रेचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे गटनेते मनोहर जोशी या द‍िग्गजांनी भूषविले होते. सध्या केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एमसीएचे दोन क्लब खरेदी केल्याची माहिती एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीएस नायक यांनी दिली. याशिवाय एमसीएचा वेलिंगटन क्रिकेट क्लब आदित्यचा मित्र रजत मेहता याने खरेदी केला तर न्यू हिंदू क्रिकेट क्लबला उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी खरेदी केला आहे.
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना क्रिकेटची आवड आहे. एमसीएची निवडणूक लढवणार काय, असे आदित्यला विचारले असता, त्यांनी सांगितले की, 'सध्या मी संघाची नोंदणी करण्यासाठी आलो आहे. निवडणूक लढवायची की नाही ते नंतर पाहू.'
मनमोहनसिंग जागतिक पातळीवरील हास्यास्पद प्राणी- बाळासाहेब ठाकरे
ठाकरे यांच्या कंपन्यांबाबत किरीट सोमय्यांचे घूमजाव
मनसेचे टोलनाका आंदोलन हफ्तावसुलीसाठीच- उद्धव ठाकरे