आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Party President Udav Thackeray Press Meet In Mumbai For Narendra Modi

\'सामना\'तील अग्रलेखाचा राजकीय अर्थ काढू नका- उद्धव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'देशाचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गाजावाजा होत असताना नरेंद्र मोदी यांनी केवळ 'गुजरात एके गुजरात' करावे. केवळ गुजरात राज्यातीलच यात्रेकरूंचे दु:ख समजून घ्यावे, हे देशासाठी मारकच असल्याची भूमिका शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून स्पष्ट केली आहे. त्याचा त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

'सामना'मधील अग्रलेखातून कोणावरही टीका करण्यात आलेली नाही. जे घडलं, जे दिसलं त्याचे विश्लेषण करण्यात आले असल्याचे उद्धव यांनी पत्रकारांना सांगितले. उलट काँग्रेसकडूनच मोदींवर टीका झाल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा... नरेंद्र मोदींच्या 'गुजरात एके गुजरात'चा शिवसेनेकडून समाचार!