आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Party President Uddhav Thackeray To Undertake State Wide Tour

भाजपविरोधात शिवसेना रस्त्यावर, भारिपची \'सरकार घटनाबाह्य\'ची याचिका हायकोर्टाने फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात सत्तेत आलेले भाजपचे सरकार घटनाबाह्य असल्याची भारिपची याचिका मुंबई हायकोर्टाने आज (गुरुवारी) फेटाळली. सरकार स्थापन करण्याचे सर्व अधिकार राज्यपालांना असतात. त्यामुळे हायकोर्ट त्यात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासदर्शक ठरावास आठ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, मुदतीची तारीख उलटल्यानंतर 11 नोव्हेंबरला भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यामुळे राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा भारिप बहुजन महासंघाने केला होता. भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणीची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.

हायकोर्टात गुरुवारी भारिपच्या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र अखेर हायकोर्टाने भारिपची याचिका फेटाळली. राज्यात सरकार स्थापन करण्याचा अधिकार राज्यपालांना असून त्यात आपल्याला हस्तक्षेप करता येत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, अल्पमतातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असल्याचे म्हणत, शिवसेनेने मुंबईत रस्त्यावर येऊन आंदोलन सुरु केले आहे. मुलुंड चेकनाका परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज (गुरुवार) राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया...