आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजनदार खात्यांसाठी शिवसेनेचे दबावतंत्र, भाजपला कचाट्यात पकडण्याची खेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्ली निवडणुकीत पडझड झाल्याने दयनीय अवस्था झालेल्या भाजपला नेमकी संधी साधून कचाट्यात पकडण्याची खेळी शिवसेनेने खेळली आहे. पराभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोले लगावतानाच दुसरीकडे दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आराोप करत राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचे धमकीसत्र सुरू केले आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मलईदार खाती पदरी पाडून घेण्यासाठीच शिवसेना आक्रमक झाली असून, त्यासाठीच हे दबावतंत्र वापरले जात असल्याचे बोलले जाते. या महिनाअखेरीस हा विस्तार होण्याची शक्यता आहे. गृह, अर्थ, महसूल, शिक्षण, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे ही कॅबिनेट दर्जाची वजनदार खाती मानली जातात.

सत्तेत सहभागी असले तरी शिवसेना-भाजपत बेदिली, धुसफूस सुरूच आहे. त्यातच दिल्लीतील निकालावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हसतमुखाने टीकास्र सोडल्याने उभय पक्षांत शाब्दिक युद्ध भडकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वच भाजप नेत्यांच्या ही टीका जिव्हारी लागली. भाजपनेही मग शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.त्यातच ‘केजरीवाल जिंकले तर मग हारले कोण?’ असा खोचक सवाल विचारून आगीत तेल ओतले.
दरम्यान, पक्षप्रमुखच मैदानात उतरल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांतील असंतोषालाही तोंड फुटले. महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी अधिकार दिले नाहीत, कामच करू देत नाहीत, असे सांगत राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी राजीनामा दिला. पाठोपाठ गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर हेही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी वायकर यांची एक फाईल मुख्य सचिवांनी परत पाठवल्याचे समजते.
पुढे वाचा... शिवसेनेची नेमकी खदखद, युतीत धुसफूस कशी