आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena President Uddhav Thackeray's Statement

पाकला जशास तसे उत्तर कधी देणार : ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तान भारतावर हल्ले करतोय. पठाणकोट झाले, आता आणखी कुठे हल्ला होणार आहे ठाऊक नाही. अशा स्थितीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणताहेत, पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ. पण ते कसे आणि कधी देऊ हे सांगत नाहीत. होतेय फक्त चर्चा. कदाचित चर्चा करून पाकिस्तानला थकवण्याचा विचार असावा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. मुंबई मनपावर झेंडा फडकवण्याचे स्वप्न आत्ताच हळद लागलेले पाहू लागले आहेत, अशी टीका करत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उद्धव शनिवारी बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू आणि मुंबई मनपावरून भाजपला चांगलेच टोले लगावले. उद्धव म्हणाले, देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण आहे, असे म्हटले जात आहे. हिंदूंबाबत चर्चा केली की असहिष्णुता होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे नेहमी माझ्या हिंदू बांधवांनो, अशीच भाषणाने सुरुवात करीत. आजही तेच वातावरण आहे. पुण्यात एका तरुणाला केवळ हिंदू म्हणून जाळून टाकले. मात्र, त्याबाबत कोणी काही बोलत नाही. मी दादरीचे समर्थन करत नाही; परंतु हिंदू म्हणून पेटवले जाते ते असहिष्णुतेच्या व्याख्येत बसते का, प्रश्नही त्यांनी केला.

दहशतवादी इसिस संघटना देशात खोलवर रुजत आहे. मुंबई, मराठवाड्यात त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. आपण ईदचे बकरे बनून त्यांच्यापुढे जायचे का? त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.
विधानसभेवरही शिवसेनेचाच भगवा
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुंबई मनपावर झेंडा फडकवण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ताच हळद लागलेल्यांना मुंबई मनपावर झेंडा फडकवण्याचे स्वप्न पडू लागलेले आहे. शिवसेना गल्लीबोळात पसरलेली आहे आणि ९३ च्या दंगलीत मुंबईला शिवसेनेनेच वाचवले म्हणून मुंबईकर शिवसेनेच्या हाती सत्ता सोपवतात. त्यांना गल्लीबोळ माहीत आहे का? असा खोचक प्रश्नही त्यांनी भाजपला केला. दिल्ली, बिहारवर झेंडा फडकवला का? उगाचच फडफडताहेत, असे सांगत विधानसभेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असेही ते म्हणाले.