आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाची ‘शोभा’ अन् आंदोलनाचा डे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी माणूस, मराठी चित्रपट व मुख्यमंत्र्यांविरोधात अवमानकारक टिपण्णी करणार्‍या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यासमोर गुरुवारी शिवसैनिक व रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी वडापाव व दहीमिसळ या अस्सल मराठी मेनूची प्रतीकात्मक भेटही डे यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, याच वक्तव्याबद्दल विधानसभेत डे यांच्यावर हक्कभंग दाखल झाला
आहे.

कायद्याची गरजच काय ?
प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचा मला प्रचंड आदर आहे. मी कायमच मराठी चित्रपटांचे समर्थनदेखील करत आलो आहे; पण चित्रपट कुठलाही असू देत प्रेक्षकांना आवडला तर तो हिट होतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने असा कायदा करण्याची आवश्यकता वाटत नाही. - आमिर खान, अभिनेता (एका कार्यक्रमात)

शोभा डे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर त्यांना मराठी संस्कृती व खानपान पसंत नाही तर त्या इथे महाराष्ट्रात राहतातच कशाला? अशा लोकांना स्वत:ला मराठी म्हणवून घेण्याचा काहीच अधिकार नाही. - संजय राऊत, शिवसेना नेते

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मराठी- अमराठी अशी वातावरण निर्मिती करू पाहात आहे. याच उद्देशाने त्यांनी शोभा डे यांच्या घराबाहेर आज आंदोलन केले. हा प्रकार हास्यास्पद आहे. - संजय झा, कॉंग्रेसचे नेते

आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.छाया : संदीप महाकाल