Home »Maharashtra »Mumbai» Shiv Sena Says In An Artical Bjp May Win Polls But Can It Save Kashmir

महाराष्ट्रातील सत्ता टिकेल, पण काश्मीर टिकेल का? 'सामना'तून शिवसेनेचे भाजपवर टिकास्त्र

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 15:38 PM IST

  • महाराष्ट्रातील सत्ता टिकेल, पण काश्मीर टिकेल का? 'सामना'तून शिवसेनेचे भाजपवर टिकास्त्र
मुंबई- शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सेनेने भाजपवर निशाना साधला आहे. "महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण कश्मीरची लढाई जिंकणार काय? जवानांचे प्राण वाचतील काय? कश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय? याचे उत्तर देशाला हवे आहे!" अशा शब्दात शिवसेने भाजपला सुनावले आहे.

अमित शाहांची नजर महाराष्ट्रातील मध्यावधीकडे...
- सेनेने सामनातील अग्रलेखात म्हटले आहे की, अमित शहा आणि त्यांच्या पक्षांची नजर महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणुकांवर आहे. पण आम्ही मध्यावधीच्या निकालाऐवजी काश्मीर आणि दार्जिलिंग प्रश्नांवर चिंतीत आहोत.
- अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, कधी पर्यंत आम्ही शहिद जवानांची संख्या मोजणार आहोत. अमित शहा म्हणतात की महाराष्ट्र सरकार आपले पाच वर्ष पुर्ण करण्याच्या अंतिप टप्प्यात आहे. परंतु, काश्मीर भारताच्या नकाशावर राहणार आहे का? असा सवाल देखील समानात उपस्थित करण्यात आला आहे.
- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती तरुणांनी जवानांवर केलेल्या दगड फेकीचे समर्थन करतात आणि दुसरीकडे जवानांनाच तेथील परिस्थितीसाठी जबाबदार ठरवतात.
अग्रलेखात आणखी काय म्हटले आहे...?
- मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती कश्मीरचे काय होणार? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार?
- अनंतनाग जिल्ह्यात पोलीस पार्टीवर हल्ला करून सात पोलिसांना ठार करण्याचे भेकड कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. पोलीस व जवान यांच्या हौतात्म्यांचे आकडे मोजायचे तरी किती, हा प्रश्न आमच्यापुढे आहे.
- फडणवीस यांचे सरकार पाच वर्षांसाठी टिकेलच टिकेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली आहे, पण देशाच्या नकाशावर कश्मीर टिकेल काय?
- महाराष्ट्रात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरकस भूमिका घेते. राष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्र व देशाच्या स्वाभिमानाचे मत मांडते म्हणून शिवसेनेस धडा शिकविण्याचे डावपेच आखले जातात, पण कश्मीरात ‘अराष्ट्रीय’ भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी भाजप समर्थपणे उभी आहे. मेहबुबांच्या बेलगाम अराष्ट्रीय वक्तव्यांवर ‘ब्र’ काढण्याची हिंमत परिवारातील लोक दाखवत नाहीत.

Next Article

Recommended