आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची नोंद करताना मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कै.बाळासाहेबांच्या मृत्यूची नोंद जन्मनोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. मृत्यूची नोंदणी करण्यासाठी महापालिकेकडे रजिस्टरच नसल्यानेही उघड झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असणारी मुंबई महापालिकेत मृत्यूची नोंदणी करण्यासाठी लागणार्या रजिस्टरसाठी किरकोळ खर्च केला जात नाही, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूची नोंद जन्मनोंदणीच्या रजिस्टरमध्ये होणे, हे दुर्दैवंच म्हणावे लागेल.
भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी सर्वात आधी ही बाब नजरेस आणून दिली. शेलार हे काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीत गेले असता त्यांच्या लक्षात आले की, मृत्यूची नोंद जन्म नोंदणीच्या रजिस्टरमध्ये होत आहे. त्यांनी याबाबतीत संबंधित व्यक्तिला विचारले असता, स्टेशनरी संपली असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे मृत्यूची नोंद जन्मनोंदणी रजिस्टरमध्ये होत आहे.
दरम्यान, दादर येथील स्मशानभूमीत बाळासाहेबांच्या मृत्यूची नोंदही जन्मनोंदणी रजिस्टरमध्ये केल्याचे मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांना समजले. या प्रकारानंतर मुंबईसह परिसरातील जवळपास सर्वच स्मशानभूमीतील स्टेशनरी संपल्याचेही समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.