आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Supremo Uddhav Thackeray Targets Rahul Gandhi

काँग्रेसचे ‘तारे’ आता कुठे जमिनीवर आलेत, उद्धव ठाकरेंचा राहूल गांधींना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसचे तारे आता कुठे जमिनीवर अाले अाहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. अंधेरी येथील भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते बाेलत हाेते. दाेनच दिवसांपूर्वी राहूल यांनी मुंबईत येऊन भाजप- शिवसेेनेवर टीका केली हाेती.
मुंबईतील माेकळ्या भूखंडाच्या मुद्द्यावर मनसेने केलेल्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘मोकळ्या मैदानांचे भूखंड शिवसेनेने कधीच खाल्ले नाहीत, मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये, ती जागा मुंबईकरांना मिळावी म्हणून आम्ही योजना आणली. भाजपनेही त्यास पाठिंबा दिला आणि मात्र काही जण विरोध करत आहेत. मोकळ्या मैदानावर १५ टक्के बांधकामाची अट रद्द करून तेथे फक्त आवश्यक सुविधांसाठी एक टक्का बांधकाम करण्याची अट ठेवावी, असे मनपा आयुक्तांनासांगितले आहे.’ मैदान दत्तक पाॅलिसीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याबाबत ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली नाही. जनतेच्या मुळावर येणारा हा केंद्राचा भूसंपादन कायदा नाही. केंद्राच्या कायद्याला एकट्या शिवसेनेने तीव्र विराेध केला. आज तो कायदा केराच्या टोपलीत गेला. जनतेला काय हवे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे. धोरण संमत केले तेव्हा भाजपसोबत होती. विरोध करणाऱ्यांना या मैदानांवर झोपड्या बांधून एसआरए धोरण राबवायचे असावे. हे धोरण आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी ठरवले आणि आयुक्तांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनीच केली, तेव्हा त्यांनीच स्पष्ट आदेश द्यायला पाहिजे होते. विरोध करण्यापेक्षा यावर चर्चा व्हावी’, ठाकरे म्हणाले.