आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Targets Shobha De In Samaana Editorial

शोभा डे विरोधात शिवसेना आक्रमक, मुखपत्रात म्हटले आण्टी; घराबाहेर निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखवण्याला विरोध करणार्‍या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शोभा डे यांच्या घराबाहेर शिवसेनेने गुरुवारी निदर्शने केली आहेत. त्याआधी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून डे यांचा उल्लेख शोभा 'आण्टी' असा करण्यात आला असून त्यांच्या तोंडात कोणीतरी झणझणीत वडापाव व तिखट मिसळ कोंबा हो ! असे सांगण्यात आले होते.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले 'शोभा आण्टी'
शाब्बास शोभा आण्टी, शाब्बास! महाराष्ट्रात जन्मास येऊन मराठीचे पांग आपण चांगलेच फेडत आहात. इतर कोणी ही ट्विटरवरची टिवटिव केली असती तर एकवेळ समजण्यासारखे होते. पण शोभा आण्टी या मराठी बाईने ही टिवटिव केली हे महाराष्ट्राचे दुर्दैव. अर्थात महाराष्ट्राच्या नशिबी हा दुहीचा शाप इतिहास काळापासूनच आहे. पण दादागिरीचा विषय ‘आण्टी’ने काढला म्हणून सांगायचे. इतिहास काळात शिवाजी महाराज व आताच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादागिरी केली नसती तर शोभा आण्टीच्या आधीच्या व आताच्या पिढ्या पाकिस्तानात जन्मास आल्या असत्या व बहुधा त्यांना ‘पेज थ्री’च्या पार्ट्या बुरख्यातच साजर्‍या कराव्या लागल्या असत्या. पण मराठीचे भान नाही, स्वाभिमान नाही. झोकांड्या देत पेगच्या हिशेबात हवे ते बरळायचे असाच प्रकार चालला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, शोभा डेंना भेट देण्यात आलेला शिव वडापाव आणि मिसळ